मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भिवंडीत चोरट्यांचा धुडगूस, एकाच रात्री फोडली 6 दुकाने

भिवंडीत चोरट्यांचा धुडगूस, एकाच रात्री फोडली 6 दुकाने

चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भिवंडी, 29 फेब्रुवारी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर, कशेळी गावात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून सध्या त्यांचा शोध घेण्यात येत आहे.   काल्हेर, कशेळी गावात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही तोडले. मात्र सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही असल्याने चारही चोर कशा पध्द्तीने चोरी करतात, हे सर्व दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. काल्हेर गावात अपना बाजार सुपर मार्केट, रिबन्स अ‍ॅन्ड बलुन्स, केक शॉप, काव्य मेडिकल, चन्द्र मेडिकल, लिगैथ्यु केक शॉप, अशी दुकाने चोरड्यांनी फोडली. कशेळी इथं चोरड्यांनी सहा दुकाने फोडून साहित्य,  रोख रक्कम चोरून नेली आहे.  या घटनेमुळे स्थानिक शिवसेनेचे रोहिदास पाटील यांनी  पदाधिकाऱ्यांसह  आमदार शांताराम मोरे यांच्याकडे धाव घेतली आहे. मात्र नारपोली पोलीस ठाण्यातील बिट मार्शल रात्रीची गस्त घालत नसल्याने चोरीच्या घटनात वाढ होत आहे. हेही वाचा - वडिलांची हत्या करून 10 वीतील मुलाने घरातच पुरला मृतदेह, 2 महिन्यांनंतर झाला उलगडा याआधीही पडला होता मोठा दरोडा भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे काही दिवसांपूर्वी चार दरोडेखोरांनी मोठी लूट केल्याचा प्रकार समोर आला होता. दरोडेखोरांच्या टोळक्याने जगदीश बळीराम पाटील यांच्या घरात शिरून त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून घरातील 60 लाखांच्या रोख रकमेसह 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपयांचे 421 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 86 लाख 30 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याची घटना घडली होती.
First published:

Tags: Bhiwandi, Crime news

पुढील बातम्या