S M L

भिवंडी कोर्टानं निश्चित केलेले आरोप राहुल गांधींनी फेटाळले, पुढची सुनावणी 10 आॅगस्टला

भिवंडी कोर्टानं संघ अब्रू नुकसानीप्रकरणी राहुल गांधींवरचे आरोप निश्चित केलेत. कोर्टाचे आरोप राहुल गांधींनी अमान्य केलेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 12, 2018 12:12 PM IST

भिवंडी कोर्टानं निश्चित केलेले आरोप राहुल गांधींनी फेटाळले, पुढची सुनावणी 10 आॅगस्टला

मुंबई, 12 जून : भिवंडी कोर्टानं संघ अब्रू नुकसानीप्रकरणी राहुल गांधींवरचे आरोप निश्चित केलेत. कोर्टाचे आरोप राहुल गांधींनी अमान्य केलेत. पुढची सुनावणी 10 आॅगस्टला होणार.

मार्च २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. याप्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्याचीच सुनावणी आज कोर्टात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 12:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close