भिवंडीत भाजपचे 'हे' 'योगी आदित्यनाथ' पराभूत

भिवंडीत भाजपचे  'हे' 'योगी आदित्यनाथ' पराभूत

अंबादास सिंघम उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले गुरू मानतात. सिंघम यांचा पेहराव देखील योगी आदित्यनाथ यांच्यासारखाच असतो.

  • Share this:

26 मे : भिवंडी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे महापौर तुषार चौधरी अवघ्या 91 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या अंबादास सिंघम यांचा पराभव केला.  होय अंबादास सिंघम हे नाव फिल्मी वाटत असेल पण माणूसही तितकाच फिल्मी आहे.

अंबादास सिंघम उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले गुरू मानतात. सिंघम यांचा पेहराव देखील योगी आदित्यनाथ यांच्यासारखाच असतो. सिंघम यांनी योगींची कॉपी करून महापौर तुषार चौधरी यांना घाम फोडला खरा पण शेवटी तुषार चौधरीच विजयी झाले.

या विजयाचा तुषार चौधरींना विशेष आनंद मात्र झाला नाही कारण तुषार चौधरी दिवसभरात मतमोजणी केंद्रावर फिरकलेच नाहीत. कदाचीत चौधरी यांना आपल्या निसटत्या विजयाची कल्पना होती. चौधरी यांच्या पॅनेलमध्ये इतर दोन उमेदवार भाजपचे विजयी झाले. त्यामुळे भिवंडीचे महापौर विजयी होऊन देखिल त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 04:25 PM IST

ताज्या बातम्या