72 वर्षांच्या गोविंदा आजोबानी फोडली हंडी

72 वर्षांच्या गोविंदा आजोबानी फोडली हंडी

खाद्या गोष्टीची आवड असेल तर वय आडवं येत नाही असं म्हणतात. आणि तेच दाखवून दिलंय. वाड्याच्या 72 वर्षीय लक्ष्मण साळूंखे यांनी

  • Share this:

15 आॅगस्ट : एखाद्या गोष्टीची आवड असेल तर वय आडवं येत नाही असं म्हणतात. आणि तेच दाखवून दिलंय. वाड्याच्या 72 वर्षीय लक्ष्मण साळूंखे यांनी...

वाडा शहरातल्या शिवाजीनगर, साठमचाळ युवक मंडळाची दहीहंडी लक्ष्मण साळुंखे या आजोबांनी तिसऱ्या थरावर चढून फोडली. साठमचाळ परिसरात राहणारे लक्ष्मण साळुंखे हे इथल्या प्रत्येक सण, उत्सवामध्ये हिरिहिरीने सहभागी होतात.

या परिसरातील लहान मुलं, युवकांना जमा करुन ते प्रत्येक सण उत्सवाची परंपरा जपतायत.  विविध सण, उत्सवांची गाणी, संवाद लक्ष्मण साळुंखे यांची तोंडपाठ असून ही गाणी गाऊन ते इथल्या शिवाजीनगर रहिवाशांच्या आनंदात भर घालतात. यावर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात ७२ वर्षीय लक्ष्मण साळुंखे या वृद्धाने तिस-या थरावर चढून दहीहंडी फोडून सर्वच तरुणांना आपण अजूनही तरुण असल्याचे दाखवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2017 06:22 PM IST

ताज्या बातम्या