S M L

VIDEO : चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेणारी रेणुका होती गर्भवती

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2018 08:34 PM IST

VIDEO : चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेणारी रेणुका होती गर्भवती

भाईंदर, 07 आॅगस्ट : भाईंदर रेल्वे स्थानकात काळीज चिरणारी घटनासमोर आली. एका गर्भवती आईने आपल्या 3 वर्षांच्या चिमुरडीसह रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. रेणुका सिंग यादव असं महिलेचं नाव आहे. सदर घटनेची नोंद रेल्वे पोलिसांनी भाईंदरच्या नवघर पोलीस स्थानकात दाखल केली. या घटनेत नवघर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. बुलेट घेण्यासाठी पती पिंटू यादव तिला त्रास देत होता.

सोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका महिलेनं आपल्या मुलीसह रेल्वेच्या खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुपारी 12:17 वाजताही घटना घडली. रेणुका पिंटु यादव (वय 22) असं या मृत महिलेचं नाव होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक आणि संतापजनक माहितीसमोर आली.  चार वर्षांपूर्वी दोघांच्या मुळगावी उत्तरप्रदेशमध्ये लग्न झालं होतं. काही दिवसांत दोघांच्या संसाराला फुल उमलले. मुलगी आरोहीचा त्यांच्या आयुष्यात दाखल झाली. मात्र, लग्नानंतर पिंटू यादव तिला त्रास देत होता. मृत रेणुका सिंह यादव वडिलांनी आरोप केला आहे की, तिचा पती पिंटू यादव तिला हुंड्यासाठी अनोनात त्रास देत होता. पती आपल्या पत्नीकडे बुलेट गाडी मागत होता.  अखेर या महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून गर्भवती अवस्थेत आपल्या चिमुरडीला घेऊन रेल्वे खाली त्यांच्या मुलीने जीवन संपवलं.नवघर पोलिसांच्या माहितीनुसार, 22 वर्षीय मयत रेणुकाचा पती आणि चिमुकली आरोहीच्या नराधम पिता पिंटू याला नवघर पोलिसानी अटक केली असून त्याच्या विरोधात हुंडाबळी कैद्या अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

हेही वाचा

 झुंज संपली, एम. करूणानिधी यांचं निधन

Loading...
Loading...

पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास

PHOTOS : 3 पत्नी आणि 6 मुलं, करुणानिधींच्या आयुष्यातील 8 गोष्टी

उपाशी ठेऊन जीव गेला नाही, जन्मदात्यांनीच मुलीचा घोटला गळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 08:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close