Elec-widget

भीमा कोरेगाव प्रकरणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

भीमा कोरेगाव प्रकरणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

'भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावी'

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ निर्णयाचा धडाका लावला आहे. आरे कारशेडबाबत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर नाणार प्रकल्पाविरोधातही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहे.

Loading...

या निर्णयानंतर राष्ट्रवादीने भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून याबद्दल मागणी केली आहे. भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी विनंती मुंडे यांनी केली.

दरम्यान, भीमा कोरेगाव आणि इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते आणि युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. तेही गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन दिले.

'महापोर्टल बंद करण्यात यावे'

तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही  महापोर्टल बंद करण्यात यावे अशी मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मात्र, महापोर्टल बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच महापोर्टल बंद करण्याऐवजी ते अद्यावत आणि सक्षम करता येते का यावरही विचार व्हावा असं मत एमपीएससीच्या उमेदवारांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com