News18 Lokmat

'साध्वी प्रज्ञासिंग यांचे तोंड काळे करणाऱ्या गावाला ५ लाखाचे बक्षिस देणार'

प्रज्ञासिंग यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 04:20 PM IST

'साध्वी प्रज्ञासिंग यांचे तोंड काळे करणाऱ्या गावाला ५ लाखाचे बक्षिस देणार'

मुंबई, 24 एप्रिल: देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली आहे. प्रज्ञासिंग यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

हे देखील वाचा: साध्वी प्रज्ञासिंह यांना कोर्टाचा दिलासा; 'निवडणूक लढवण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही'

आपण श्राप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांची हत्या झाली, असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञासिंग यांनी केले होते. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची भलावण त्यांनी केली होती. शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या शहीद वीर जवानांचाही अपमान करून प्रज्ञासिंग यांनी देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली आहे. असे असताना देशप्रेमाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या भाजपने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा घाट घातला आहे. भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हे त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीदांच्या नावाने देशभर मतांचा जोगवा मागत असतानाच त्यांचाच पक्ष शहीदांचा अवमान करणाऱ्या व एका आरोपीला लोकसभेचे तिकीट देऊन आपल्या देशभक्तीचे प्रमाण देत आहे. त्यांच्या या कृतीचा देशभरातून विरोध होत असला तरी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे तिकीट भाजप कायम करीत असेल तर भोपाळमधील देशप्रेमी जनता प्रचारासाठी फिरणाऱ्या प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे तोडं काळे करावे. तसेच चप्पलाचा हार घालून गाढवावर फिरवणे अशा वेगळ्या प्रकारे सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.


Loading...

VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: bhim army
First Published: Apr 24, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...