S M L

भीम आर्मीकडून दादर स्थानकाचं नामांतर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे लावले फलक

भीम आर्मीने दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर केलं. दादरच्या मध्य आणि पश्चिम स्थानकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे फलक या भीम आर्मीकडून लावण्यात आले.

Sonali Deshpande | Updated On: Dec 6, 2017 04:46 PM IST

भीम आर्मीकडून दादर स्थानकाचं नामांतर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे लावले फलक

06 डिसेंबर : भीम आर्मीने दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर केलं. दादरच्या मध्य आणि पश्चिम स्थानकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे फलक या भीम आर्मीकडून लावण्यात आले. या नावाचे स्टीकर्स करून आणण्यात आले होते. ते भीम आर्मीकडून लावले गेले आणि आता दादर स्थानकाऐवजी उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असाच करावा असं भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं.

दादरचं नामांतर करून त्याला बाबासाहेबांचं नाव द्यावं, ही भीम आर्मीची मागणी जुनीच आहे. आज त्यांनी त्याबद्दल आंदोलन केलं.

मुंबईतल्या चैत्यभूमीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत येतात. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 04:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close