सगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक

सगळ्यांना हसवणारा भाऊ कदम जेव्हा दुखावला जातो.... ही पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल भावुक

विनोदाचा बादशहा अभिनेता भाऊ कदम याने फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपली खंत व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : विनोदाचा बादशहा अभिनेता भाऊ कदम याने फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपली खंत व्यक्त केली आहे. भाऊ कमदची प्रमुख भूमिका असलेल्या 'नशीबवा'न या सिनेमाला शो मिळत नसल्याने भाऊ कदमने नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्यावरून अनेक कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता भाऊ कमदने ही फेसबुक पोस्ट लिहित काही सवाल उपस्थित केले आहेत.

भाऊ कदमची फेसबुक पोस्ट

एखादा परभाषीय चित्रपट 'हिट' होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून हे दाखवलं जातं की तुमचा 'मराठी' चित्रपट चालतच नाही. मध्यमवर्गीयांसाठी बनवलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. मग बोंब उठवली जाते की, तुमचा मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत. 'नशीबवान' च्या निमित्ताने मला आणि माझ्या निर्मात्यांना याचीच प्रचिती आली. ज्या डोंबिवली चा उल्लेख मी हवा येऊ द्या च्या प्रत्येक भागात करतो, ज्या 'डोंबिवलीचा मी' म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही. आमचा संपूर्ण चित्रपट मुलुंडमध्ये चित्रित झाला आहे. तिथेही एकाही चित्रपटगृहात 'नशीबवान' ला स्थान मिळाले नाही. कित्येक लोक चित्रपटगृहात जाऊन परत फिरले आणि ऑनलाइन बुकींग करून गेलेल्यांना शो कॅन्सल झाल्याचे कारण देऊन 'हिट' झालेल्या हिंदी चित्रपटाची तिकिटं त्यांच्यावर लादली गेली. एका दाक्षिणात्य चित्रपटाने ह्या आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले पण आपण आपल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही. काबाडकष्टाने चित्रपट तयार करणारे निर्माते आता प्रदर्शनासाठीही खस्ता खात आहेत. एक-एक चित्रपटगृह मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

ज्या हिंदी चित्रपटसृष्टीला खत पाणी घालून आपल्या महाराष्ट्राने जोपासलं, मोठं केलं ती आपल्या मराठी सिनेमाची अशीच पायमल्ली करत राहणार का? आपल्या मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का?


VIDEO : पुण्यात पुन्हा पाणीगळती, वाहतुकीचा मोठा खोळंबा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या