• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • भातसा धरण 99 टक्के भरलं, पाच दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भातसा धरण 99 टक्के भरलं, पाच दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणारे शहापूर  तालुक्यातील भातसा धरण (Bhatsa Dam) ओव्हरफ्लो (Overflow) झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणारे शहापूर  तालुक्यातील भातसा धरण (Bhatsa Dam) ओव्हरफ्लो (Overflow) झालं आहे. काल पाच दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र आज धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील पाण्याचा  विसर्ग कमी झाला. त्यामुळे आज तीन दरवाजे बंद करून  दोन दरवाजे 2.5 सेमी ने उघडे ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भातसा धरण ओव्हरफ्लो झालं. त्याआधी बारवी धरणही ओव्हरफ्लो झालं. धरणातील पाणीसाठा उपयुक्त पाणी साठा  - 927.128 द.ल.घ.मी. एकूण पाणी साठा -  961.128 द.ल.घ.मी. टक्केवारी - 98.41% आजचा पाऊस - 69.00 मि.मी. एकूण पाऊस - 2387.00 मि.मी. उल्हासनगर: हातोड्याचा धाक दाखवत केलं अपहरण, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी   गेल्या आठवड्याभरापासून शहापूर तालुक्यात दररोज जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई आणि ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणारं शहापूर तालुक्यातील भातसा धरण 99 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे अडीच सेंटीमीटरने उघडण्यात आले. मात्र धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणातील पाण्याचा  विसर्ग कमी झाला त्यामुळे आज तीन दरवाजे बंद करून दोन दरवाजे उघडे ठेवण्यात आलेत. सापगाव येथील भातसा नदीच्या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: