मुंबई, 04 ऑगस्ट : मुंबईच्या (mumbai) जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर (jogeshwari vikhroli link road) अंगावर काटा आणणारा एका अपघात घडलाय. पण नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणीही दगावले नाही. हा सर्व अपघात सीसीटीव्हीत (cctv video) कैद झाला आहे. पण हा अपघात पाहतांना तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल.
मुंबईचा जोगेश्वरी पूर्वेत विक्रोली लिंक रोडवर दुर्गानगर जंक्शन या ठिकाणी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरला मोठा अपघात झाला.
मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर डम्परची दुचाकीला धडक pic.twitter.com/92DQqIZIVl
— News18Lokmat (@News18lokmat) August 3, 2021
मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा डंपर दुर्गानगर जंक्शन येथून भरधाव वेगाने जात असताना अचानक डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि डंपर वेगाने इकडे तिकडे पळू लागला.
मालदिवमध्ये अवतरली महाराष्ट्राची 'अप्सरा'; सोनाली कुलकर्णीने दाखवला Bikini अवतार
इतक्यात तिथून जात असलेली एक दुचाकी चालकाला धडक देत डंपरने पुढे जाऊन बेस्ट बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका थरारक होता की, यात डंपरचा चालक आणि बाईकस्वार वाचतील का? असं वाटलं होतं. पण सुदैवाने बाईकवर बसलेले दोन जण जखमी झाले तर बेस्ट बस चालक सुद्धा जखमी झाला असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मात्र, हा थरार अपघात घटनास्थळावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. मात्र, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन गुन्हा नोंद केला असून पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.