Home /News /mumbai /

भारत बंद : मुंबई पोलिसांनी दिला आक्रमक इशारा, जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला तर...

भारत बंद : मुंबई पोलिसांनी दिला आक्रमक इशारा, जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला तर...

मुंबई पोलिसांकडून आंदोलकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.

मुंबई, 7 डिसेंबर : विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिल्याने राज्यातही या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मात्र उद्या होणाऱ्या या बंदच्या आधी मुंबई पोलिसांकडून आंदोलकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. कोणीही जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी दिला आहे. मुंबईमध्ये पोलिसांची रेग्युलर पेट्रोलिंग असणार आहे. अतिरिक्त सुरक्षा बल तैनात असतील. तसेच लोकांना आवाहन आहे की, त्यांनी कायदा व सुवेवस्था राखण्यास मदत करावे. तर कोविड 19 मुळे मुंबईत कलम 144 लागू असल्याने नागरिकांनी याबाबत सतर्क रहावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. पुणे व्यापारी संघटनेनं जाहीर केली भूमिका शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यास पाठिंबा आहे, परंतु दुकाने बंद राहणार नाहीत, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केली आहे. शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्षांनी उद्या भारत बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असल्याने दुकाने बंद न करण्याबाबत सभासदांचा सूर आहे . त्यामुळे दुकाने बंद न ठेवता मोर्चामध्ये सामील होण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Farmer, Mumbai police

पुढील बातम्या