नवी दिल्ली, 13 डिसेंबर : पोलीस ठाण्याचं नाव आणि पोलीस म्हटलं की आधी आपल्या चेहऱ्यावर भीती आणि कपाळाला आठ्या पडतात. पोलीस ठाण्याची पायरी कधी चढू नये असं अनेकदा ऐकायला मिळतं पण महाराष्ट्रातील ठाण्यापासून जवळ असलेल्या एका पोलीस ठाण्यात कैदी आणि आरोपी देखील पुन्हा जाण्यासाठी आतूर झाले आहेत. गुन्हा केल्यानंतर एकदा तुरुंगाची हवा खाऊन आल्यावर पुन्हा पायरी न चढण्याचा संकल्प करणाऱ्या गुन्हेगार आणि कैद्यांना या पोलीस ठाण्याची ओढ लागल्याच्या काही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
नेमका काय आहे प्रकार?
भाईंदर इथे मीरा रोडजवळ असलेल्या नया नगर पोलीस ठाणे सध्या तुफान चर्चेचा विषय झालं आहे. केवळ इथल्या कामामुळे नाही तर या पोलीस ठाण्याला गुगलवर मिळणाऱ्या रिव्ह्यूमुळे ही चर्चा होत आहे. कैदी आणि जे आरोपी या पोलीस ठाण्यातून बाहेर पडले त्यांनी हा रिव्ह्यू दिल्याची चर्चा आहे. या पोलीस ठाण्याला चक्क 4 ते 5 स्टार्स कैद्यांकडून मिळाल्यानं सोशल मीडियावर तुफान पोस्ट व्हायरल होत आहेत.
थाना इतना अच्छा कि कोई दुबारा गिरफ्तार हो कर आना चाहे
How do you assess it.#policereforms #policing@ipsvijrk @ipskabra @arunbothra @dubey_ips @arifhs1 @AwanishSharan @PriyankaJShukla @sonalgoelias @editorsunil @TheVijayKedia @ParveenKaswan @upcoprahul pic.twitter.com/eczJebXOmH
— Santosh Singh (@SantoshSinghIPS) December 12, 2020
हे वाचा-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं सांभाळलं बॅलेन्स, पोलीसही झाले अवाक् LIVE VIDEO
या पोलीस ठाण्यातील कारागृहातून बाहेर आलेल्या व्यक्तीनं गुगलवर रेटिंग दिलं आहे. आर्यन डीनेने 5 स्टार रेटिंग देत म्हटलं आहे की मला अटक केल्यानंतर मी तुरुंगात असताना जेवणासाठी मला राजमा आणि भात विचारण्यात आलं होतं. इतकच नाही तर इथे सगळ्यांनी खूप चांगली काळजी घेतली.
हे वाचा-लग्न करून 3 दाम्पत्य निघाले दर्शनाला, असा अपघात की 7 जणांचा जागीच गेला जीव
या पोलिस स्टेशनच्या रेटिंगविषयी आयपीएस अधिकारी संतोष सिंह यांनीही ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यांनी त्यासह लिहिले, 'पोलीस स्टेशन इतके चांगले आहे की एखाद्याला परत यायला आवडेल.'
हे रेटिंग मिम्स असल्याची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमका हा काय प्रकार आहे हे अद्याप समोर आलं नसलं तरी अनोख्या रेटिंगमुळे हे पोलीस स्टेशन चर्चेचा विषय नक्की झालं आहे. सोशल मीडियावर रेटिंगचे आणि कमेंट्सचे स्क्रिनशॉट तुफान व्हायरल होत आहेत.