भांडुपमध्ये फेरीवाल्यांच्या हल्ल्यात पिता आणि मुलांसह तिघांचा मृत्यू

भांडुपमध्ये फेरीवाल्यांच्या हल्ल्यात पिता आणि मुलांसह तिघांचा मृत्यू

फेरीवाल्याशी अब्दुल अली खान यांचा वाद झाला. यावरुन फेरीवाल्यानं त्याच्या दोन साथीदारांसह अब्दुल अली खान आणि त्यांच्या दोन मुलांवर हल्ला केला.

  • Share this:

19 मार्च : भांडुपमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. भांडुपमधल्या सोनापूरमध्ये फेरीवाल्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातले आहेत. भांडूपमधल्या झकेरीया कम्पाऊंडमधल्या अब्दुल अली खान यांच्या घरासमोर एक फेरीवाला भाजीची गाडी लावत होता. या फेरीवाल्याशी अब्दुल अली खान यांचा वाद झाला. यावरुन फेरीवाल्यानं त्याच्या दोन साथीदारांसह अब्दुल अली खान आणि त्यांच्या दोन मुलांवर हल्ला केला.

यामध्ये अब्दुल अली खान आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय. फेरीवाल्यांचा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावरुन पोलीस घटनेचा तपास करतायत. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अब्दुल अली खान वय 50 वर्षे आणि त्यांची 2 मुलं सैबाज अब्दुल अली खान आणि सादाब अब्दुल अली खान यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात सैबाज खान यास मुलुंड जनरल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मयत घोषित केले. तर उपचारादरम्यान गुलाम अली यांचाही मृत्यू झाला आहे.

First published: March 19, 2018, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading