Home /News /mumbai /

मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, भाई जगताप यांची अध्यक्षपदी वर्णी

मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा निर्णय, भाई जगताप यांची अध्यक्षपदी वर्णी

भाई जगताप यांच्या रुपाने काँग्रेसला मराठी चेहरा मिळाला आहे. तसंच पक्ष संघटनेत प्रदीर्घ अनुभव असणे ही भाई जगताप यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते.

    मुंबई, 19 डिसेंबर : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी (Mumbai Congress President)अखेर भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. तर चरणसिंह सपरा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रक काढत याबाबतची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला होता. भाई जगताप यांच्यासह मनहास, चरणसिंग सपरा आणि नसीम खान हेदेखील अध्यक्षपदासाठी स्पर्धेत होते. मात्र मुंबई काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी ओळख असणाऱ्या भाई जगताप यांची अखेर अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाई जगताप का ठरले वरचढ? भाई जगताप हे रस्त्यावरील आंदोलनांपासून ते टीव्ही डिबेटपर्यंत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडत असतात. मुंबई काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि युवा नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. भाई जगताप यांच्या रुपाने काँग्रेसला मराठी चेहरा मिळाला आहे. तसंच पक्ष संघटनेत प्रदीर्घ अनुभव असणे ही भाई जगताप यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते. भाई जगताप यांच्यासाठी मिलिंद देवरा, अशोक चव्हाण हे आग्रही होते. त्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.
    First published:

    Tags: BMC, Congress

    पुढील बातम्या