सी.विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपला... हे आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

सी.विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपला... हे आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांच्या जागी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत.

  • Share this:

मुंबई,1 सप्टेंबर: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांच्या जागी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. आरिफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कलराज मिश्र हे राजस्थानचे, बंडारू दत्तात्रेय हे हिमाचल प्रदेशचे, तमिलीसाई सुंदरराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला..

भगतसिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. इंग्रजी साहित्यातून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पिथोरागडहून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पीयूष' साप्ताहिकाचे ते संस्थापक तसेच प्रबंध संपादक होते. सन 1977 मध्ये आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगवासही भोगवा लागला होता. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. 2001 ते 2007 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते.

VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2019 12:32 PM IST

ताज्या बातम्या