मुंबई, 05 फेब्रुवारी: छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदेने राजकारणात प्रवेश केला आहे. टीव्ही मालिकेमुळे शिल्पा घराघरात पोहोचली होती. पण मालिकेचे दिग्दर्शक आणि चॅनलचे प्रोड्यूसर यांच्याशी झालेल्या वादामुळे शिल्पाने मालिकाच सोडली होती. त्यानंतर शिल्पा जवळ जवळ दोन वर्ष टीव्ही जगतापासून दूर राहिली होती. पण आता शिल्पाने एका नव्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पाने मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिल्पा शिंदेची लोकप्रियता अफाट आहे हे बिग बॉसच्या वेळी दिसून आले होते. याआधी शिल्पाने देखील राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. मालिका सोडल्यानंतर शिल्पाला बिग बॉसमध्ये संधी मिळाली. त्या काळात शिल्पाला सलमान खानने पाठिंबा दिला होता. बिग बॉसच्या 11व्या पर्वाची विजेती झाल्यानंतर शिल्पाला चित्रपटांची ऑफर देखील आली होती. बिग बॉसचे विजेतेपद मिळाल्यानंतर शिल्पा पुन्हा छोट्या पदड्यावर दिसू लागली होती.
शिल्पा आणि वाद
आतापर्यंत शिल्पा अनेक वादामुळे चर्चेत आली आहे. 'भाभी जी घर पे है'चा वाद झाल्यानंतर शिल्पाने महाराष्ट्र नव निर्माण सेनेसोबत पत्रकार परिषद घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी शिल्पा यांचे जवळचे संबंध आहेत. अशातच आता शिल्पाने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिल्पाच्या लोकप्रियतेचा काँग्रेसला होणार फायदा
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिल्पा शिंदेच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला होऊ शकते.
काय म्हणाली शिल्पा...
-मनसे फक्त मराठी बघत
-वाद झाला तेव्हा मनसेने केवळ मराठी मुद्दा उचलला
-देशासाठी काही तरी करायचे आहे म्हणून राजकारणात
-काँग्रेसने कधी जातपात केलं नाही
-काँग्रेसच्या विचारसरणीवर माझा विश्वास
-राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हीच इच्छा
-देशात बदल घडवण्याची गरज
-देशात केवळ काँग्रेस बदल करू शकते
Special Report : ऑनलाईन बँकिंग करताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान