मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दिवाळीत फटाके फोडणार असाल तर सावधान; गृहमंत्रालयाने जाहीर केली नवी नियमावली

दिवाळीत फटाके फोडणार असाल तर सावधान; गृहमंत्रालयाने जाहीर केली नवी नियमावली

कोरोना नियंत्रणात म्हणून दिवाळी दणक्यात साजरी करणं पडू शकतं महागात

कोरोना नियंत्रणात म्हणून दिवाळी दणक्यात साजरी करणं पडू शकतं महागात

कोरोना नियंत्रणात म्हणून दिवाळी दणक्यात साजरी करणं पडू शकतं महागात

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, २७ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Maharashtra Corona Update) रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं शक्य झालं आहे. मात्र तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) भीती पूर्णपणे गेली, असं म्हणता येऊ शकणार नाही. त्यामुळे दिवाळी (Diwali Celebration) दणक्यात साजरी करू असा विचार करील असाल तर जरा थांबा.

दिवाळीपूर्वीच गृहविभागाने (Maharashtra Home Minister) नवी नियमावली जाहीर केली आहे. अद्यापही कोरोनाचा धोका असल्या कारणाने या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे. (Beware if firecrackers are going to explode on Diwali Home Ministry announces new rules )

नियमावली...

-फटाके फोडणे टाळावे, राज्य सरकारकडून अपील केले जात आहे.

-कोरोना झालेल्या आणि होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे चालू वर्षी फटाके फोडणे टाळावे

-त्याऐवजी दिव्याची आरास करून उत्सव साजरा करावे.

-राज्यातील धार्मिक स्थळ खुली केली असली तरी दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादेत राहील याची दक्षता घ्यावी.

-खरेदीसाठी गर्दी टाळावी

-ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे.

-दिवाळी पहाट कार्यक्रम कोविड १९ संसर्ग प्रतिबंधात्मक नियमानुसार होतील.

हे ही वाचा-COVAXIN ला काही तासांत मंजुरी मिळण्याची शक्यता, लवकरच येऊ शकते GOOD NEWS

हे नियम पाळणं गरजेचं आहे. कारण रशिया (Coronavirus in Updates Russia), ब्रिटन (Britain Coronavirus Update) आणि चीनमध्ये (China Coronavirus) कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्येदेखील बदल झाल्यानं भीतीचं वातावरण आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीनं (corona pandemic) जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यातील काहींना कोरोनावर मात करणं शक्य झालं तर काहींना आपला जीव गमवावा लागला. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानं जगभरातील विविध राष्ट्रांनी आपल्या देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोविड निर्बंध हटवले होते. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर होतं. मात्र, आता पुन्हा काही देशांमध्ये कोरोना महामारीनं डोकं वर काढल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates, Diwali 2021