बेस्टला घरघर, संपावर जाण्याबाबत आज निर्णय

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून प्रशासनाविरूध्द आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 10:25 AM IST

बेस्टला घरघर, संपावर जाण्याबाबत आज निर्णय

18 जुलै : मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट सध्या अडचणीत सापडलीय. आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून प्रशासनाविरूध्द आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलाय.

त्याच पार्श्वभूमीवर आज बेस्टच्या सगळ्या छोटया मोठ्या १२ संघटनांचे प्रतिनिधी आज बेस्टमध्ये संप करावा अथवा करू नये यासाठी मतदान घेणार आहेत. बीएमसी ही बेस्ट पालक संस्था आहे. त्यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता बीएमसीनं बेस्टचं बजेट आपल्या बजेटमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी या सगळ्या संघटनांची आहे.

२००७ नंतर पहिल्यांदाच या संघटना संपावर जाण्याचा विचार करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...