'बेस्ट'च्या कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण

'बेस्ट'च्या कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण

बेस्टची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळणं कठीण झालंय.

  • Share this:

मुंबई,1 ऑगस्ट: मुंबईची सेकंड लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या 'बेस्ट'चे कर्मचारी आजपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे पालकत्त्व मुंबई पालिकेने स्वीकारावं, या आणि इतर मागण्यांसाठी बेस्टमधील कर्मचारी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.

बेस्टची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळणं कठीण झालंय. त्यामुळे मुंबई महापालिकेने बेस्टला आधार द्यावा तसंच बेस्टच्या कर्मचाऱ्याला मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या धरतीवर पगार मिळावा अशी बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तशाच बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या अजूनही काही मागण्या आहेत.

याच संदर्भात सोमवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बेस्ट उपक्रमाची पालिका आयुक्त, महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. ही बैठक अपयशी ठरल्याने आणि बेस्टला आर्थिक आधार मिळावा म्हणून 'बेस्ट बचाव' मोहिमेसाठी उपोषणाचा नारा देण्यात आला आहे.

वडाळा आगारात चालणाऱ्या या उपोषणामुळे बेस्टच्या सेवांवर मात्र परिणाम होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 09:10 AM IST

ताज्या बातम्या