मुंबई, 10 जानेवारी : सलग तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप कायम आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. 'आम्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही,' असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. बुधवारी दिवसभर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बेस्ट कर्चमाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठका होत राहिल्या मात्र त्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीदेखील मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस धावणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.