बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

पण आता साडे पाच हजार रुपये उचल मिळत असल्यामुळे त्यांनी हा संप मागे घेतला आहे.तसंच २७ तारखेला बेस्टच्या बीएमसी विलीनीकरणाचा प्रस्ताव येतं आहे. या दोन्ही निर्णयांमुळे उपोषण आणि २१ तारखेचा संप दोन्ही मागे घेत असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2017 05:48 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई,18 ऑक्टोबर: बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप आणि उपोषण मागे घेतलं आहे. दिवाळी बोनस मिळावा म्हणून बेस्ट कर्मचारी या भाऊबीजेला संपावर जाणार होते.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा संप दिवाळी बोनस मिळावा म्हणून करण्यात येत होता.पण आता साडे पाच हजार रुपये उचल मिळत असल्यामुळे त्यांनी हा संप मागे घेतला आहे.तसंच २७ तारखेला बेस्टच्या बीएमसी विलीनीकरणाचा प्रस्ताव येतं आहे. या दोन्ही निर्णयांमुळे उपोषण आणि २१ तारखेचा संप दोन्ही मागे घेत असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे .बोनसची मागणी करणाऱ्या बेस्ट कर्मचार्यांना बीएमसीने आगावू प्रत्येक साडे पाच हजार रुपये उचल देण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही रक्कम आगावू स्वरूपात असेल. कर्माचारी संघटनांनी सुधारणा प्रक्रिया राबवून दिल्यास ही रक्कम बोनसमध्ये रूपांतरित होईल. अन्यथा आगावू रक्कम म्हणून समजली जाईल.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला असला तरी ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...