बेस्ट कर्मचाऱ्यांना सलाम, बंद पुकारला असतानाही आदेश मोडून उचललं मोठं पाऊल

बेस्ट कर्मचाऱ्यांना सलाम, बंद पुकारला असतानाही आदेश मोडून उचललं मोठं पाऊल

या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी आदर्श आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवार 18 मेपासून बेमुदत बंद पुकारला खरा. पण बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक ऐकली नाही आणि कामावर आले. संपात सहभागी न होण्याचं कामगारांनी ठरवलं आहे. संपापेक्षा या कामगारांनी आपल्या सेवेला महत्व दिल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होतं आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या आवाहनाला न जुमानता बेस्ट कर्मचारी सेवेसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांच्या या निर्णय म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकासाठी आदर्श आहे. सकाळी 8 वाजता 1500 पेक्षा अधिक बेस्ट ड्राइव्हर आणि कंडक्टर कामावर हजर झाले आहेत.

खरंतर अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या अन्यथा संप करू असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला होता. पण त्यावर दोन दिवस कोणताचा निर्णय घेतल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ शकतो. याचाच विचार करून कर्मचाऱ्यांनी आधी आपल्या कर्तव्याचा विचार केला. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून तब्बल 1000 बसेस मुंबईत मागविण्यात आल्या. सोमवारपासून संप करण्याची बेस्ट वर्कर्स युनियनची हाक दिली तर संप मोडून काढण्याच्या पवित्र्यात सरकार असून त्यांनी तशी तयारीही केली आहे.

लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरूच, 24 तासांत 157 रुग्णांनी गमावले प्राण

या अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट सुमारे 3260 कामगार काम करत आहेत. दररोज 'बेस्ट'च्या बस या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार या सर्वांची मुंबईच्या आणि मुंबईच्या बाहेरून ने आण करत आहेत.

या सेवेमुळे मुंबईला एक मोठा आधार मिळतो. परंतु बेस्ट प्रशासन मात्र या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप बेस्ट कामगार कृती समितीने केला आहे. आतापर्यंत बेस्ट सुमारे 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 7 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असं असलं तरीही बेस्ट प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा कवच दिले नाही. सोबतच या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी कुठला वेगळी व्यवस्था केलेली नाही.

बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO

या कर्मचाऱ्यांना कामावर हजर असताना मास्क सॅनिटायझर किंवा इतर सुरक्षात्मक साधनं पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेली नाहीत. त्यामुळे आपण संपाच्या निर्णयापर्यंत पोहोचलो असल्याची प्रतिक्रिया संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली होती. त्यामुळे आजपासून बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून स्वतःच्या सुरक्षेसाठी घरीच रहावं असं आवाहन कृती समितीनं आपल्या सदस्यांना केलं होतं.

प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

संपादन - रेणुका धायबर

First published: May 18, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या