महायुतीला धक्का, शिवसेना-भाजपला मतदान न करण्याचा 'या' संघटनेचा निर्णय

नारायण राणेंची संघटनेच्या कर्मचाऱ्यांचाही सेना- भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 09:49 PM IST

महायुतीला धक्का, शिवसेना-भाजपला मतदान न करण्याचा 'या' संघटनेचा निर्णय

स्वाती लोखंडे,(प्रतिनिधी)

मुंबई,17 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला चार दिवस शिल्लक असताना शिवसेना-भाजपच्या महायुतीला धक्का बसला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत शिवसेना-भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणेंची संघटनेच्या कर्मचाऱ्यांचाही सेना- भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला जवळपास 31 हजार कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा वेतन करार अजूनही झालेला नाही, प्रशासनाने परिपत्रक काढून फक्त सेना-भाजपच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे वैतागलेल्या कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांनी शिवसेना-भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्याही संघटनेने भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टची कर्मचारी संख्या जवळपास 39 हजार एवढी आहे. यापैकी सेना-भाजपचे 8 हजार कर्मचारी वगळता जवळपास 31 हजार कर्मचारी सेना भाजपला मतदान करणार नाहीत.

दिवाळीआधी मिळणार बोनस

विधानसभा निवडणूक मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी आहे. ते संपल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळेल, अशी माहिती बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी बोनसची अद्यापही प्रतीक्षा असतानाच यंदा ९ हजार १०० रुपये बोनस देण्याचा निर्णय बेस्ट व्यवस्थापनाने घेतला आहे. मात्र त्यासाठी बेस्ट समितीची अंतिम मंजुरीही आवश्यक असून त्यानंतरच कर्मचाऱ्यांना लागू होऊ शकतो. दरम्यान, बेस्टचा सामंजस्य करार मान्य नाही. यात आर्थिक कारणांमुळे कर्मचाऱ्यांचा पगार, नोकरीचा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चिंता लागून आहे. याचा विचार स्वाक्षरी केलेल्या कर्मचाऱ्यांनी का केला नाही? बेस्ट उपक्रमाच्या या भूमिकेविरुद्ध असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियन अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले.

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचा पलटवार, पाहा काय म्हणाले...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...