बेस्ट लॉंच करणार इलेक्ट्रिक बस

बेस्ट लॉंच करणार इलेक्ट्रिक बस

या बसमध्ये एकूण 31 सीट्स असतील. या बसेस पेट्रोल किंवा डिझेलवर चालणार नाहीत. या बसेस इलेक्ट्रिकच्या बॅटरीवर चालतील

  • Share this:

मुंबई,10 नोव्हेंबर: बेस्टच्या किंग लाँग बसचा प्रयोग फसला होता. आता त्यानंतर बेस्ट एक नवीन प्रयग करत आहे. बेस्ट इलेक्ट्रिक बस लॉंच करत आहे.

बेस्टच्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचं आज उद्घाटन होणार आहे. अशा दोन बस आजपासून बेस्टच्या ताफ्यातल्या असतील. यापूर्वी बेस्टनं एसी किंगलाँग बस बेस्टच्या ताफ्यातल्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या होत्या. पण त्यांची दुरुस्ती बेस्टला करता आली नाही. तसंच काही अन्य कारणांमुळे तो प्रयोग फसला होता. सध्या आर्थिक संकटातून जाते आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचीही पगारवाढीची मागणी होत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी संपही केला होता. अशा परिस्थितीत बेस्टला ही इलेक्ट्रिक बस तारु शकेल का हे येत्या काळात कळेल. या बसमध्ये एकूण 31 सीट्स असतील. या बसेस पेट्रोल किंवा डिझेलवर चालणार नाहीत. या बसेस इलेक्ट्रिकच्या बॅटरीवर चालतील. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर बेस्ट 300 कि.मी धावू शकेल असा अंदाज आहे. यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

त्यामुळे या बसेस तरी बेस्टची परिस्थिती सुधारायला मदत करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 11:55 AM IST

ताज्या बातम्या