S M L

बेस्टचा संप मागे, उद्धव ठाकरेंची यशस्वी मध्यस्थी

काल रात्रीपासून सुरू असलेला बेस्टचा संप मागे घेण्यात आलाय. उद्धव ठाकरेंनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरलीय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 7, 2017 05:09 PM IST

बेस्टचा संप मागे, उद्धव ठाकरेंची यशस्वी मध्यस्थी

मुंबई, 07 आॅगस्ट : काल रात्रीपासून सुरू असलेला बेस्टचा संप मागे घेण्यात आलाय. उद्धव ठाकरेंनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरलीय.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'बेस्ट कर्मचाऱ्यांना अतिशय नाईलाजाने संपावर जावं लागलं. मी त्यांना शब्द देतो की त्यांचा पगार वेळेवर होईल. बेस्ट आणि महापालिका अर्थसंकल्प एक करू असं अाम्ही वचन दिलं होतं. ते करू पण तुम्ही संप केला तर तोटा वाढेल. तुमच्या मागण्या योग्य आहे ते आम्ही मान्य करू. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही संपावर जाऊ नका. तुम्ही कामावर या, संप मागे घ्या.'

उद्धव ठाकरेंच्या या आश्वासनानंतर  शशांक राव यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close