बेस्टची एसी बस आजपासून बंद

मुंबईची बेस्टची एसी बस आजपासून रस्त्यावर दिसणार नाहीत.

Sonali Deshpande | Updated On: Apr 17, 2017 10:31 AM IST

बेस्टची एसी बस आजपासून बंद

17 एप्रिल : मुंबईची बेस्टची एसी बस आजपासून रस्त्यावर दिसणार नाही.सतत तोट्यात चालणाऱ्या बसवरील खर्च परवडत नसल्याने ऐन उन्हाळ्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बसमधून प्रवास करणाऱ्या 18 ते 20 प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.तर एसी बसचा पास असलेल्या प्रवाशांना त्यांच्या पासाचे पैसे परत मिळणार आहेत.

एसी बसमधून बेस्टला चार-पाच वर्षांत 80 कोटी महसूल मिळाला असून खर्च 400 कोटी एवढा आहे.

किती आहेत एसी बसेस?

एसी बसेसची संख्या - 266

प्रत्यक्षात सुरु असलेल्या बसेस- 106

एसी बसमार्ग - 25

पासधारकांची संख्या - 216

दररोजचे प्रवासी - 18 ते 20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close