S M L

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 'बेस्ट'चा प्रवास 4 रूपयाने महागणार?

बेस्टचं किमान भाडं ८ रु. वरुन १२ प्रस्तावित करण्यात आलं आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2017 12:47 PM IST

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 'बेस्ट'चा प्रवास 4 रूपयाने महागणार?

06 एप्रिल :  आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने आता बेस्टच्या तिकीट दरातच वाढ करण्याचं निश्चित केलं आहे. बेस्टचं किमान भाडं ८ रु. वरुन १२ प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता येत्या काही दिवसांमध्ये बस तिकीटासाठी 12 रुपये मोजावं लागणार आहे.

बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आज बेस्ट समितीची बैठक होणार आहे. यामध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार असून, त्यात अनेक पर्याय प्रस्तावित करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तोट्यामुळे बेस्टने हा निर्णय घेतला आहे. ज्यातला एक भाग म्हणून भाडे वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, रजा प्रवास भत्ता, मुलांना शिष्यवृत्ती, आजारपणासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा सुद्धा बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आलं आहे.

सध्याच्या बस तिकिटात प्रत्येक कि.मी मागे 4 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. एवढचं नाही तर, मुंबईत जे विद्यार्थी बेस्टने प्रवास करतात त्यांना यापुढे जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण बेस्ट विद्यार्थ्यांच्या पासच्या तसंच सवलतीच्या तिकीटच्या दरात दुपटीने वाढ करणयाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत म्हटलं होतं. त्यानूसार, बेस्टला अनुदान देण्याची मागणी बेस्ट प्रशासनाने केली होती. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नव्हती. त्यात, आर्थिक चणचणीमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार पंधरा दिवस रखडलेत. या सर्व पार्श्वभूमीवर बेस्टचे तिकीट दर वाढवण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close