अखेर पगार मिळाला, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर पगार मिळाला, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

मे महिन्यातला अर्धा पगार खात्यात जमा झाल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय.

  • Share this:

21 जून : थकीत पगाराविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलेलं संपाचं हत्यार तुर्तास म्यान केलंय. मे महिन्यातला अर्धा पगार खात्यात जमा झाल्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय.

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचे केवळ अर्धाच  पगार देण्याचा निर्णय जाहीर केला होता. एवढंच नाहीतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार 2 तारखेऐवजी 20 तारखेपर्यंत मिळाला नाही. उरलेला अर्धा पगार कधी मिळणार या बद्दल आश्वासन मिळालेलं नाही.  याविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने  22 जूनपासून संपाचा जाण्याचा इशारा दिला होता. अखेरीस प्रशासनाने माघार घेत कर्मचाऱ्यांचा अर्धा पगार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...