बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, साखळी उपोषणाला सुरुवात

बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, साखळी उपोषणाला सुरुवात

बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर आज (मंगळवारी) आंदोलनाचं हत्यार उपसलंय. बेस्ट कामगारांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलीये.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई 01 आॅगस्ट : बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर आज (मंगळवारी) आंदोलनाचं हत्यार उपसलंय. बेस्ट कामगारांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलीये.

गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाहीयेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत तोडगा काढण्यासाठी तीन बैठका झाल्या पण त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. शेवटी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात बेस्टमधील नऊ कामगार संघटना सहभागी आहेत.

बेस्ट बसच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसल्याच्या आणि तीन बैठका घेवूनही तोडगा न निघाल्याच्या विरोधात आज बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बेमुदत साखळी उपोषण करायला सुरुवात केली आहे. बेस्टच्या वडाळा डेपोला हे उपोषण सुरू करण्यात आले असून यात ९ संघटना सहभागी झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 10:24 PM IST

ताज्या बातम्या