Home /News /mumbai /

'बेस्ट'च्या विद्युत विभागाचे कर्मचारीही आजपासून संपावर

'बेस्ट'च्या विद्युत विभागाचे कर्मचारीही आजपासून संपावर

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर गुरूवारी तिसऱ्या दिवशीही कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर बंगल्यात पार पडलेल्या 7 तासांच्या बैठकीतही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही.

    मुंबई, 11 जानेवारी : 'बेस्ट'च्या विद्युत विभागाचे 6000 कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. याबाबत कर्मचारी संघटनेनं परिपत्रक काढलं आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या संप आणखीच तीव्र होणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर गुरूवारी तिसऱ्या दिवशीही कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर बंगल्यात पार पडलेल्या 7 तासांच्या बैठकीतही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळं सलग चौथ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. शनिवारी पालिका कर्मचारी आंदोलन करणार बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चौथ्या दिवशीही संप सुरू ठेवला आहे. या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियननेही पाठिंबा दिला आहे. बेस्टच्या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास शनिवारी मुंबई महापालिकेचे सफाई, मलनिस्सारण, रुग्णालय तसेच इतर कर्मचारी आंदोलनात उतरतील, असा इशारा म्युन्सिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.  बोनस, वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला आधी सत्ताधारी शिवसेनेने नैतिक पाठिंबा दिला होता, मात्र एकाच दिवसात हा नैतिक पाठिंबा सेनेने काढून घेतला. यामुळे संतापलेल्या शिवसेना युनियन सदस्यांनी सामूहिक राजीनामी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना मेस्मा आणि सेवा निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा दिल्याने राज्य सरकार, पालिका, बेस्ट प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. यामुळे गेले चार दिवस संप सुरू असला तरी त्याबाबत अद्याप कोणातही तोडगा निघालेला नाही.  VIDEO : भुकेने व्याकुळ वासराला कुत्रीने पाजले दूध!
    First published:

    Tags: Best, Strike

    पुढील बातम्या