मुंबई, 17 मे : 21 मेपासून मुंबई शहर काळोखात जाणार असल्याचं बोललं जात आहे. कारण बेस्टनं टाटा पावरचे 561 कोटी रुपये थकवले. त्यामुळे टाटा पावरने बेस्टला नोटीस पाठवली आहे. थकवकेले 561 रुपये भरा नाहीतर 21 मेपासून वीज पुरवठा बंद करणार असं पाठवलेल्या नोटीसीमध्ये लिहण्यात आलं आहे. बेस्ट टाटा पावरकडून वीज खरेदी करून मुंबईत पुरवठा करते. पण बेस्टनं डिसेंबर 2018 जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 4 महिन्याचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे टाटा पावरने करारातील तरतुदीनुसार बेस्टला नोटीस बजावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.