S M L

बेस्टने कात टाकली, 'लालपरी' आता नव्या रंगात रंगणार

बेस्ट बसच्या लाल रंगाची जागा आता पांढऱ्या रंगानं घेतली आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 08:01 PM IST

बेस्टने कात टाकली, 'लालपरी' आता नव्या रंगात रंगणार

स्वाती लोखंडे, मुंबई

19 एप्रिल : मुंबईची लाल परी अर्थात बेस्ट बस आता कात टाकणार आहे. बेस्टची लाल डब्बा ही ओळख पुसण्यासाठी आता बेस्टचा रंग बदलण्यासाठी प्रयत्न केला जातोय. बेस्ट बसच्या लाल रंगाची जागा आता पांढऱ्या रंगानं घेतली आहे.

जे जे स्कुल ऑफ अप्लाईड आर्ट्स च्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून ही बेस्टची नवी बस तयार झालीये. बेस्टचे व्यवस्थापक जगदीश पाटील यांनी जेजे स्कुल ऑफ आर्ट्सच्या डीन यांनी पत्रं लिहिलं होतं. त्यानंतर 5 माजी विद्यार्थ्यांची एक टीम तयार केली गेली. आणि त्यांनी ही बस साकारली.

आता ही बस लवकरच मुंबईभरात फिरेल आणि या बसबद्दल मुंबईकरांची मतं हे विद्यार्थी जाणून घेतील आणि मग बेस्ट्या बसचा रंग बदलायचा की नाही हा निर्णय बेस्ट समिती घेईल. सध्या मात्र अशा बेस्टच्या 2 बसेस तयार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 08:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close