S M L

वर्धापन दिनीच बेस्ट संपावर,बेस्टच्या 36 हजार कर्मचाऱ्यांचा संप

36 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणारे. जवळजवळ 30 लाख प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Aug 7, 2017 09:58 AM IST

वर्धापन दिनीच बेस्ट संपावर,बेस्टच्या 36 हजार कर्मचाऱ्यांचा संप

मुंबई, 07 आॅगस्ट :बेस्टच्या वर्धापन दिनीच बेस्ट कर्मचारी संपावर गेलेत. 36 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणारे. जवळजवळ 30 लाख प्रवाशांना याचा फटका बसणार आहे

दरम्यान काल मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची समजूत काढून संप मागे घेण्याची विनंती केली. पण कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या लेखी आश्वासनाची मागणी केली. महापालिका आयुक्त लेखी आश्वासन देत नसल्यानं अखेर संपावर ठाम असल्याचं कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केलं. महापौर आणि बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी कर्मचाऱ्यांनी दहा तारखेला पगार देण्याचं आश्वासन  देऊनही बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्धार कायम ठेवलाय.

बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुस-या दिवशी करावा, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे, पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी, बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्टच्या १२ युनियनच्या कृती समितीने मंगळवारपासून उपोषण सुरू केले होते. तीन दिवस उपोषण सुरू असले तरी महापालिका किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने संपकऱ्यांची भेट घेतलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 04:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close