कमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण

कमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण

मृत्यूपूर्वी विश्वा आणि धैर्या यांनी हाॅटेलमध्ये अडकलेल्या इतरांनाही वाचवलं. जवळपास १० ते १२ जणांना या दोघा भावानी वाचवलं.

  • Share this:

29 डिसेंबर : सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विश्वा ललानी हा भाऊ धैर्य ललानी आणि आत्या प्रमिला केनिया यांना पार्टीनिमित्त सोबत घेऊन हॉटेल मोजोमध्ये गेला आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला. आग लागल्याचं समजताच विश्वा ललानी आणि धैर्य ललानी लागलीच हॉटेलच्या बाहेर आले. परंतु आत त्यांची आत्या प्रमिला केनिया अडकल्याचं समजताच पुन्हा त्यांनी हॉटेल मोजोमध्ये प्रवेश केला.

आत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या दोन्ही भावांना प्राण गमवावे लागले. महिन्याभराची सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आलेल्या धैर्यचा प्रवास मोजो हॉटेलमध्येच संपला. पण मृत्यूपूर्वी विश्वा आणि धैर्या यांनी हाॅटेलमध्ये अडकलेल्या इतरांनाही वाचवलं. जवळपास १० ते १२ जणांना या दोघा भावानी वाचवलं. अशी माहीती या दोघांचे चुलत भाऊ विरल छेडा यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी दिलीय.

First published: December 29, 2017, 1:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading