BEFORE आणि AFTER....राम कदम यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वच झाले चकित!

BEFORE आणि AFTER....राम कदम यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वच झाले चकित!

काही राजकीय व्यक्ती वेळात वेळ काढून स्वत:मध्ये बदल घडवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जुलै : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे पुरेसं लक्ष देणं अनेकांना शक्य होत नाही. त्यातही राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सततच्या व्यस्ततेमुळे आरोग्य आणि फिटनेस या गोष्टी दुर्लक्षित होतात. त्यामुळे मग वजन वाढणे, विविध आजारांनी ग्रासने अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र त्यातही काही राजकीय व्यक्ती वेळात वेळ काढून स्वत:मध्ये बदल घडवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनीही स्वत:मध्ये असाच बदल घडवला आहे. राम कदम यांनी वजन कमी करत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपला जुना फोटोही शेअर केला असून त्यांच्यामध्ये झालेला बदल अधोरेखित केला आहे.

'Fitghatkopar आणि Coronamuktghatkopar' या दोन हॅशटॅगसह राम कदम यांनी आपला फोटो शेअर केला आहे. राम कदम यांनी हा फोटो पोस्ट करताच त्यांच्या समर्थकांनी त्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही वजन कमी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे हे शक्य झाल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: July 4, 2020, 9:43 PM IST

ताज्या बातम्या