मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मेहनतीच्या जोरावर बनला इंजिनिअर पण झटपट श्रीमंतीसाठी बनला हॅकर, बीडच्या तरुणाचा कारागृहातून अनेकांना गंडा

मेहनतीच्या जोरावर बनला इंजिनिअर पण झटपट श्रीमंतीसाठी बनला हॅकर, बीडच्या तरुणाचा कारागृहातून अनेकांना गंडा

ग्रामीण भागातील तरुणाने उच्चशिक्षण घेतले. मात्र, झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने सुरू केले हॅकिंग.

ग्रामीण भागातील तरुणाने उच्चशिक्षण घेतले. मात्र, झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने सुरू केले हॅकिंग.

ग्रामीण भागातील तरुणाने उच्चशिक्षण घेतले. मात्र, झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने सुरू केले हॅकिंग.

मुंबई, 25 नोव्हेंबर : आपण श्रीमंत व्हावं आणि सर्व सोयी, सुविधा आपली स्वप्न पूर्ण करावीत असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, पैसा मिळवताना तो योग्य मार्गानेच मिळवायला हवा. एका तरुणाने उच्चशिक्षण (higher education) घेत अभियांत्रिकीची पदविका मिळवली मात्र, त्यानंतर आपल्या हुशारीचा उपयोग हा गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी केल्याचं समोर आलं आहे. हा तरुण महाराष्ट्रातील बीड (Beed youth) येथील असून आता कारागृहात शिक्षा भोगत आहे.

ग्रामीण भागात जन्मलेला कृष्णा हा झटपट श्रीमंत बनण्याच्या नादात चक्क हॅकिंग करुन नागरिकांना गंडा घालू लागला आणि आता अखेर तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. कृष्णा हा नवा बदलून राहत होता. अमर अग्रवाल या नावाने तो आपल्या हुशारीचा उपयोग गैर व्यवहारांसाठी करत होता. कृष्णा हा बीड जिल्ह्यातील राहणारा, त्याचे पूर्ण नाव कृष्णा अनंत केसकर असे आहे. त्याच्या कुटुंबात आई, वडील, दोन भावंड आहेत.

झटपट पैशांसाठी हॅकिंग

कृष्णाचे दहावी पर्यंतचे शिक्षण बीडमध्ये झाले होते. मग बीडच्या शासकीय तंत्रनिकेतूनमधून त्याने अबियांत्रिकीची पदविका घेतली. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी तो पुण्यात गेला. पुण्यात त्याने उच्चशिक्षण घेत नोकरीही मिळवली. पण झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने हॅकिंग सुरुवात केली आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केली. दिव्य मराठीने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

वाचा : 'बाबा, तुम्ही बरोबर होता'; प्रेमविवाहानंतर 7 महिन्यातच उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या, लिहिली भावनिक सुसाईड नोट

अशी केली पैशांची हेराफेरी

कृष्णा केसकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो उज्जैन येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. कृष्णाने फेक वेबसाइट तरुर करुन त्याद्वारे अनेकांची फसवणूक केली आहे. वेबसाइटवरुन फाईव्ह स्टार हॉटेलची तिकीट बूक करणे, विमानाची तिकीट तो बूक करायचा आणि मग ऐनवेळी हे बूकिंग कॅन्सल करायचा. तसेच रिफंड देण्यात येणारे पैसेही देत नव्हता. हे पैसे तो कारागृहातील अधिकारी किंवा स्वत:च्या खात्यावर वळवत होता. नंतर त्याने इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यावर वळवली.

मुख्यमंत्र्यांसोबत ओळख असल्याचा दावा

कृष्णा हा नागरिकांना आपण उच्चशिक्षित असल्याचं सांगत मुख्मयंत्र्यांसोबत आपली ओळख आहे असे सांगत असे. तसेच स्विस बँकेतही खाते असल्याचा दावा करत होता. आपल्या हॅकिंगचा उपयोग करुन त्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेले ईमेल्स सुद्धा नागरिकांना दाखवले होते.

वाचा : तिच्या आत्महत्येच्या वृत्ताने धक्का, प्रियकरानेही शेतात गळफास घेत संपवलं आयुष्य 

तरुणीला लग्नाच्या नावावर गंडा

एका आयटी प्रोफेशनल तरुणीलाही कृष्णाने गंडा घातला आहे. आफण परदेशातील एका कंपनीत ईसीओ पदावर कार्यरत आहे. असे सांगत ऑनलाईन मॅरेज ब्युरोच्या नावाने एका उच्च शिक्षित तरुणीकडून त्याने व्हिसा आणि तिकीटांसाठी पैसे घेतले. अशा प्रकारे कृष्णाने त्या तरुणीला 4 लाखांचा गंडा घातला.

वडिलांचा आरोप

कृष्णाच्या वडिलांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले, कृष्णा सुरतच्या कारागृहात होता तेव्हा आम्ही त्याला भेटलो होते. त्यानंतर त्याची रवानगी उज्जैन येथील कारागृहात झाली. उजैजैन कारागृहातील अधिकारी आम्हाला कृष्णासोबत बोलून देत नाहीत. त्याला भेटूनही देत नाहीत. आम्ही 2018 पासून त्याला भेटलोच नाही. अधिकारी आपल्याकडून चुकीची कामे करुन घेतात असं कृष्माने एकदा फोनवरुन कुटुंबियांना सांगितले होते.

First published:

Tags: Beed, Crime