• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • कोयत्याला मिळेल न्याय, पंकजा मुंडेंचं भावनिक ट्वीट; मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

कोयत्याला मिळेल न्याय, पंकजा मुंडेंचं भावनिक ट्वीट; मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

'आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान...'

 • Share this:
    मुंबई, 07 सप्टेंबर : ऊसतोड कामगार प्रश्नावर भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक साद घातली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असं सांगितले. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून सर्व ऊसतोड कामगार आणि मजुरांना धीर ठेवण्याचे आवाहन केले आहे.  'कोयत्याला  न्याय मिळेल. ऊसतोड  कामगारांनी विश्वास ठेवावा. खासदार शरद पवार, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार आहे' असं पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पंकजा मुंडेंनी एकापाठोपाठ 3 ट्वीट केले आहे. 'माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष  जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे.' असं पंकजांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 'आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे' असं आवाहनही पंकजांनी कामगारांना केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे या सक्रीय राजकारणापासून काही काळ बाजूला गेल्या आहे. आता कोरोनाच्या काळात ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा यासाठी पंकजा मुंडे यांनी आता आंदोलनाचे संकेत दिले आहे.
  Published by:sachin Salve
  First published: