मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

प्रीतम मुंडे होम क्वारंटाइन, कोरोनाची लक्षण जाणवून लागल्यामुळे निर्णय!

प्रीतम मुंडे होम क्वारंटाइन, कोरोनाची लक्षण जाणवून लागल्यामुळे निर्णय!

'काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल'

'काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल'

'काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल'

  • Published by:  sachin Salve

 

मुंबई, 24 एप्रिल : बीडमध्ये (Beed) कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. सर्वसामान्यसह राजकीय नेत्यांनाही कोरोनाचा विळखा बसला आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यावेळी त्यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले आहे.

'मागील आठवड्यात बीड शहरात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक कोविड सेंटरला भेटी दिल्या, डॉक्टर आणि रुग्णांची चर्चा केली. आवश्यक त्या सूचना  देण्यात आल्या आहेत. योग्य ते काम करण्यास भाग पाडले आहे.  हे काम करून मी 18 तारखेला मुंबईत परतले. असताना अचानक माझी प्रकृती बिघडली आहे. 2 ते 3 दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागला आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे, पण रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली.

नोरा फतेहीने या हॉलिवूड अभिनेत्रीला केलं कॉपी;Same to Same ड्रेसचे PHOTO व्हायरल

तसंच, 'काही लक्षण आढळल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे,लवकरच आपल्या सेवेत परत रुजू होईल', असं आश्वासनही प्रीतम मुंडे यांनी दिले आहे.

First published: