Home /News /mumbai /

रुग्णांच्या आरोग्याची ऐशी तैशी! चक्क सलाईनमध्ये आढळलं शेवाळ

रुग्णांच्या आरोग्याची ऐशी तैशी! चक्क सलाईनमध्ये आढळलं शेवाळ

जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात ही सलाईन आढळून आली आहे. एका परिचारकांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघड झाला.

बीड, 29 जानेवारी : लोकांना कमी पैशात चांगली सेवा मिळेल या अपेक्षेने रुग्ण मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतात. मात्र याच रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवशी खेळ केला जात आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एका सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रनेमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात ही सलाईन आढळून आली आहे. एका परिचारकांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघड झाला. ही सलाईन एखाद्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात आली असती तर याचा परिणाम काय झाला असता, असा सवाल रुग्ण करत आहेत. वाचा-Alert कोरोनाव्हायरसचा प्रकोप 10 दिवसांत वाढणार, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका वाचा-जुने iPhone धोकादायक, तुम्हीही वापरत असाल तर काळजी घ्या रुग्णाच्या उपचारासाठी लावण्यात येणाऱ्या सलाईनचे घटक नसेद्वारे पूर्ण शरीरात रक्तात मिसळले जातात. त्यामुळे ही सलाईन रुग्णासाठी वापरण्यात आली असती तर एखाद्या रुग्णाला इन्फेक्शन होऊन मृत्यू होण्याचा धोका देखील होवू शकतो. त्यामुळे आता सलाईनच्या पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. वाचा-कुंपणच शेत खातंय! अँटीव्हायरस कंपनी करतेय डेटा चोरी वाचा-किती भीषण होता नाशिकचा अपघात? 26 जणांचा जीव घेणाऱ्या बस, रिक्षाचे पाहा 12 PHOTOS नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव जिल्हा रुग्णालय चर्चेत असतो. मात्र आता घडलेल्या प्रकाराने जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहे. मात्र या घटनेमुळे रुग्णांच्या जीवशी कोण खेळततर नाही ना हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी जिल्हा चिकित्सकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या