S M L

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : शासकीय सेवेत अनाथांसाठी होणार स्वतंत्र वर्गवारी

अनाथ मुलांच्या फरफटीवर न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डाॅ.उदय निरगुडकर यांनी बेधडकमध्ये 'अमृताची गोष्ट' या विषयाअंतर्गत चर्चा घडवून आणली होती

Sachin Salve | Updated On: Jan 10, 2018 10:30 PM IST

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : शासकीय सेवेत अनाथांसाठी होणार स्वतंत्र वर्गवारी

10 जानेवारी : शासकीय सेवेत अनाथ बालकांसाठी स्वतंत्र वर्गवारी तयार केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.  अनाथ तरुण तरुणींची अठरा वर्षानंतर होणारी फरफट न्यूज18 लोकमतनं मांडली होती.

अनाथ मुलांच्या फरफटीवर न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डाॅ.उदय निरगुडकर यांनी बेधडकमध्ये 'अमृताची गोष्ट' या विषयाअंतर्गत चर्चा घडवून आणली होती. अनाथ आश्रमांमध्ये वयाच्या अठरा वर्षांपर्यंत राहणाऱ्या तरुण मुला मुलींची त्यानंतर प्रचंड फरफट होते. भवितव्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो.  या प्रकरणी आता सरकारही सकारात्मक झालं असून सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र वर्गवारी तयार करणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. या निर्णयामुळे अनाथांना सरकारी नोकरीची संधी निर्माण होणार आहे.

 

अमृताची गोष्ट...

जाती पातीच्या अस्मितेच्या सगळा गदारोळ सुरु आहे... त्यात अमृताचा आपल्या अस्तित्वासाठी जगाला एक आर्त सवाल आहे... माझी जात कोणती?

अमृता... नकळत्या वयात आईची सावली गेली. मग जन्मदात्यानच डोक्यावरचं आभाळ काढून घेत अनाथ केलं. गोव्याच्या अनाथाश्रमात सोडलं.. तेव्हापासून समाजाची उपेक्षा आणि अवहेलनेचं ही अमृता विष पितीय. अमृता १८ वर्षांची झाली तेव्हा अनाथाश्रमानं सांगितलं यापुढे तुझी वाट तू शोधायची...

अनाथश्रमाचीही सावली गेली. अमृता आयुष्यात दुसऱ्यांदा अनाथ झाली. मग पुणे, अहमदनगर या शहारांचे रस्ते.. फुटपाथ...आणि स्टेशनवर तिच्या भविष्याचा शोध सुरू झाला. पण तिनं हार मानली नाही. लहानमोठी कामं करत तिनं शिक्षण पूर्ण केलं. त्यात काही जणांनी दिला मदतीचा हातही दिला.

पडेल ते काम करुन ती शिकली. स्वतच्या पायावर उभं राहाण्यासाठी धडपत राहिली. एमपीएससीची परीक्षा पासही झाली पण... जात माहीत नसल्यानं हातातून नोकरी गेली.

अमृताची गोष्ट संपूर्ण बेधडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 08:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close