कमला मिलमधली आग एकही परवाना नसलेल्या मोजोसच्या हुक्क्यामुळेच,अहवालात स्पष्ट

कमला मिलमधली आग एकही परवाना नसलेल्या मोजोसच्या हुक्क्यामुळेच,अहवालात स्पष्ट

कमला मिलमधली आग पहिल्यांदा मोजोसला लागल्याचं स्पष्ट झालं. या अहवालामध्ये मोजो हॉटेलमधल्या हुक्काच्या ठिणगीमुळे आग लागल्याचं स्पष्ट झालंय.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी : कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी लागलेल्या आगीचा अहवाल अग्निशामन दलानं महापालिका आयुक्तांना दिला. यानुसार कमला मिलमधली आग पहिल्यांदा मोजोसला लागल्याचं स्पष्ट झालं. या अहवालामध्ये मोजो हॉटेलमधल्या हुक्काच्या ठिणगीमुळे आग लागल्याचं स्पष्ट झालंय.

हुक्क्यात वापरण्यात येणारा कोळसा आणि त्यामधून निघणार ठिणग्या या मोजोस हॉटेल्सचा मोठ्या पडद्याला लागल्या.याने पडद्याला लागलेली आग छातामार्गे वन अबवमध्ये देखील पसरली, असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आलाय.

वन अबव हॉटेल्सच्या छाताला आगीने वेढल्यामुळे छताचे काही भाग जमिनीवर पडले. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यास अडथळा आला. यामुळे काही जण आपला जीव वाचवण्यासाठी शौचलयात लपले. मात्र त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

गच्चीवरील उपाहारगृहासंदर्भात अग्निशमन दलाकडून मेसर्स सायग्रिड हाॅस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड एण्टरटेन्मेंट (वन अबव्ह)साठी आरोग्य अधिकाऱ्याकडून २३ डिसेंबर रोजी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. वन अबव्हच्या गच्चीवरील उपाहारगृहासाठी आरोग्य खात्याकडे अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले असले तरी ते प्रत्यक्ष उपाहारगृहाला देण्यात आले नव्हते, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र, मोजोच्या कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

अहवालात काय म्हटलंय?

-'मोजोस'मध्ये काही लोक हुक्का ओढत होते

- हुक्क्याच्या ठिणगीमुळेच आग लागल्याचं स्पष्ट

- कोळशातून निघणाऱ्या ठिणग्या पडद्यावर पडल्या

- पडद्याला लागलेली आग छतापर्यंत पोहोचली

- आग छताच्या मार्गे 'वन अबव्ह'मध्ये पसरली

- छताचा काही भाग जमिनीवर कोसळला

- अडकलेल्यांना बाहेर पडणं कठीण

- यामुळे मग काही लोक शौचालयात लपले

- शौचालयातल्या सर्वांचा गुदमरून मृत्यू

First published: January 6, 2018, 10:31 AM IST

ताज्या बातम्या