• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • भाजप सरकारमुळेच महावितरण आर्थिक संकटात, ऊर्जामंत्र्यांनी फोडलं फडणविसांवर खापर

भाजप सरकारमुळेच महावितरण आर्थिक संकटात, ऊर्जामंत्र्यांनी फोडलं फडणविसांवर खापर

वीज बिल माफ करू, त्यात घट करू, सवलत देऊ अशी अनेक आश्वासनं महाघाडीतल्या नेत्यांनी दिली होती. मात्र कोरोनाने डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सगळंच गणित कोलमडलं आहे.

 • Share this:
  मुंबई 18 नोव्हेंबर: वीज बिल कमी करण्याच्या मुद्यावरून राज्यात सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. वीज बिल माफ करू, त्यात घट करू, सवलत देऊ अशी अनेक आश्वासनं महाघाडीतल्या नेत्यांनी दिली होती. मात्र कोरोनाने डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे सगळंच गणित कोलमडलं असून ऊर्जामंत्री नितीन राऊत(Nitin Raut) यांनी त्याचं खापर हे आधीच्या भाजप सरकारवर फोडत देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. वीज बिल कमी करण्यात येईल असं दिवाळीपूर्वी ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र त्यांचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवारांनी फेटाळून लावला त्यामुळे भाजपने आता आंदोलनाची भाषा केली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राऊतांनी भाजप सरकारमुळे महावितरण कर्जबाजारी झाल्याचं म्हटलं आहे. राऊत म्हणाले, महावितरणची थकबाकी वाढण्यास कोरोनापेक्षाही भाजपची अकार्यक्षमता कारणीभूत आहे. भाजपची सत्ता असताना वीज बिल वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपमुळेच महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. राज्याला कर्ज देताना बँकेपेक्षा जास्त व्याज दर आकारणारी भाजपचे केंद्रातील सरकार हे खरे सावकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली, हे कारण आलं समोर भाजपची सत्ता राज्यात असताना 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली. त्या काळात ना कोरोना होता, ना आजच्या सारखे आर्थिक संकट तरीही वीज बिल ग्राहकांना विशेष सवलती देऊन थकित बिल वसूल का केले नाही, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. "राज्याच्या वीज क्षेत्रासाठी आम्ही आर्थिक अनुदान मागितले असता केंद्र सरकार आम्हाला कर्ज घ्या म्हणतेय. बँका 6 ते 7 टक्क्यांनी कर्ज देत असताना केंद्र सरकार मात्र 10.11 टक्क्यांनी कर्ज देऊ केले आहे. मग खरे सावकार तर भाजपचे केंद्रातील सरकार आहे असे म्हटले तर चुकीचे ठरेल का? भाजपची सत्ता राज्यात असताना लातूर येथे नवे मीटर बसवून नंतर चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे वीज बिल वसुली करण्यात आली. ही सावकारी नव्हती का?," असा प्रश्नही त्यांनी विचारला. लॉकडाऊनचा फटका बसलेल्या मित्राला दिलं दिवाळी गिफ्ट, ऐकून विश्वासही बसणार नाही "कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे, हे खरे आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेचा बसला आहे. सरासरीची भाषा करणारे,  आंदोलनाचे इशारे देणाऱ्या भाजप नेत्यांनी त्यांची सत्ता असताना वीज बिल वसुली करण्यासाठी आपली सरासरी कार्यक्षमता दाखवली असती तर आज हा वीज बिल थकबाकीचा डोंगर उभा राहिला नसता असंही ते म्हणाले. मार्च 2014 मध्ये 14,154 कोटींवर असलेली महावितरणची सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी मार्च 2020 ला 51,146 कोटींवर पोचली. याचा अर्थ भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात महावितरणची थकबाकी तब्बल 37 हजार कोटींनी वाढली आहे. म्हणजेच भाजप सरकारच्या काळात दरवर्षी 7 हजार कोटींनी ही थकबाकी वाढली. यावरून भाजपची कार्यक्षमता सिद्ध होते," अश्या शब्दात नितीन राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: