नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध

नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध

फक्त आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई 04 मे: कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.

या निर्बंधांमध्ये सर्व विभागाला कळविण्यात आलं की त्यांनी कुठलीही नवी नोकरभरती करू नये. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांची गरज नाही ते प्रकल्प रद्द करण्यास आणि जे पुढे ढकलता येणं शक्य आहे असे प्रकल्प पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाला फक्त 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार

सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Coronavirus चा नाश करणारी लस तयार झालीच नाही तर काय होईल?

सर्व कार्यक्रम, त्यावरील खर्च रद्द. आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची तुर्तास बदली होणार नाही असेही आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी  कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे.

कोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट? आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा

जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

 

 

First published: May 4, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या