कोरोना व्हायरसची धास्ती, आरोग्य समितीचा चीन दौरा रद्द

कोरोना व्हायरसची धास्ती, आरोग्य समितीचा चीन दौरा रद्द

या दौऱ्यासाठी आरोग्य समिती मधल्या सदस्य बरोबरच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सभागृहा नेत्या विशाखा राऊत आणि काही अधिकारीही जाणार होते.

  • Share this:

मुंबई 24 जानेवारी : कोरोना व्हायरसचा परिणाम मुंबईच्या आरोग्य समितीच्या दौऱ्यावर झाला आहे. चीनला करण्यात येणारा हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी जय्यत तयारी केली होती. चीनला पत्रव्यवहार करून त्यांनी या दौऱ्यासाठी परवानगी मिळवली होती. आता इच्छुक सदस्यांना प्राथमिक रक्कम भरून पुढील कागदपत्र तयार करायची होती. परंतु मध्येच कोरोना व्हायरस बाबत अलर्ट जारी करण्यात आला. या व्हायरसचा प्रादुर्भाव हा चीन हाँगकाँग या भागात असल्यामुळे हा दौरा आता रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. कारण याच देशात समिती सदस्य दौरा करणार होते. परंतु आता अलर्ट संपेपर्यंत कोणीही या देशांमध्ये जाण्याची इच्छा ठेवणार नाही सोबतच आरोग्याची काळजी म्हणूनही स्वतः सदस्य या दौऱ्याला तयार नाहीत.

या दौऱ्यासाठी आरोग्य समिती मधल्या सदस्य बरोबरच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सभागृहा नेत्या विशाखा राऊत आणि काही अधिकारीही जाणार होते. आता मात्र मुंबईतच तीन संशयित रुग्ण आढळल्यामुळे हा दौरा अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. दुसरीकडे चीनने त्यांच्या देशातून जगभरात प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना या व्हायरसबाबत माहिती दिली असून भारतासह इतर देश हे त्यांच्या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून घेत आहे.

मुंबईकरांनो लक्षात ठेवा, घरात भाडेकरू असेल तर माहिती पोलिसांना द्या

हा वायरस नवीन प्रकारचा असून याबाबत संशोधन झाले नसल्याने त्याबाबत अधिक माहिती स्वतः चीनकडे सुद्धा नाही. त्यावर अजून योग्य ते उपचारही माहिती नाही. मुंबईत दोन दिवसात या आजाराचे तीन संशयित आढळून आले आहेत ज्यांच्यावर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना व्हायरसचा धोका, मुंबईतल्या संशयित रुग्णांची संख्या 3 वर

या दौऱ्यामध्ये सदस्य चीनमधल्या आरोग्य स्वच्छता या बाबींचा अभ्यास करणार होते आणि आणि हा दौरा फेब्रुवारी महिन्यात आखण्यात आला होता या विषाणूंची लागण पसरू नये यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी माहिती उपलब्ध करून दिली आहे. सोबतच मुंबई महापालिकेनेही कस्तुरबा गांधी रुग्णालयात तब्बल 14 कक्ष हे या आजाराच्या संशयित रुग्णांसाठी तयार करून ठेवले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BMCdoctor
First Published: Jan 24, 2020 09:21 PM IST

ताज्या बातम्या