मुंबई, 12 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मोठा फटका मुंबईतील शाळांना बसला आहे. गेल्या १२ दिवसात मुंबईमधील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे वेतन होऊ शकलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झालं आहे.
शिक्षण विभागाकडे शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील सर्व बिलं जमा आहेत. तसंच निधी देखील उपलब्ध आहे. मात्र हा निधी वळविण्याच्या अधिकाराबाबत संभ्रम असून यात मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरडले जात आहेत. त्यामुळे शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात यावेत अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
तात्काळ आदेश न दिले गेल्यास आंदोलनाचा इशारा या शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget session, Sa;ary, Teachers