Home /News /mumbai /

स्त्रियांना दाढीवाले पुरुष जास्त आवडतात, पण तोपर्यंतच...

स्त्रियांना दाढीवाले पुरुष जास्त आवडतात, पण तोपर्यंतच...

नीट शेप दिलेली दाढी, पिळदार मिश्या आणि त्यावर ताव मारणारे तरुण दिसणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही.

  मुंबई 16 जानेवारी : दर काही वर्षांनंतर फॅशन बदलत असते. काही वर्षांपर्यंत 'क्लिन शेव्ह' ही तरुणांमध्ये फॅशन होती. मात्र आता परिस्थिती बदललीय. दाढी ठेवणं ही आता फॅशन झालीय. देशभर याचा ट्रेंन्ड सुरू आहे. ही फक्त भारतातच नाही तर जगभरच फॅशन असल्याचं दिसून येतंय. नीट शेप दिलेली दाढी, पिळदार मिश्या आणि त्यावर ताव मारणारे तरुण दिसणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. पुरुषांच्या या दाढी वाढविण्यावर अमेरिकेत एक संशोधन करण्यात आलंय. त्यात स्त्रियांना दाढीवाले पुरुष आवडतात असं आढळून आलंय.  भारतात तर दाढी ठेवण्याची प्रथाच होती. दाढी आणि पिळदार मिशा ठेवणं हे भारतात खास 'पुरुषी'पणाचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे या संशोधनातून महिलांच्या आवडी-निवडींच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्या आहेत. याच विषयावर 2013मध्ये अमेरिकेत एक संशोधन करण्यात आलं होतं. त्यात स्त्रियांना क्लिन शेव केलेले पुरुष आवडतात असा निष्कर्ष निघाला होता. मात्र Royal Society Open Science या जर्नलमध्ये नव्याने संशोधन अहवाल प्रसिद्ध झालाय त्यात स्त्रियांना उत्तम दाढी राखलेले पुरुष जास्त आकर्षीत करत असल्याचं दिसून आलंय. Vegan चा फंडा : बटर, चीजच नव्हे तर दूध, दहीसुद्धा खात नाहीत हे सेलेब्रिटी पण पूर्ण अंगावर केस असलेले पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. त्याचबरोबर दाढीची चांगल्या प्रकारे निगा न राखलेले पुरुषही त्यांना आवडत नाहीत असंही आढळून आलंय. अनेकांची दाढी ही वाढलेली असते मात्र त्यात नीट नेटकेपणा आढळत नाही. अस्ताव्यस्त केस. त्याची काळजी घेतली नाही तर त्यातून इन्फेक्शनही होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत दाढीची योग्यपद्धतीने काळजी घेता तोपर्यंतच तुम्ही आकर्षक राहू शकता.

  नात्यात सतत वाद होतायत? पार्टनरशी बोलाताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख टाळाच

  दाढीही ही फॅशन लक्षात घेऊन बाजारातही आता दाढीची निगा राखण्यासाठी अनेक तेल, क्रिम्स, जेल, ब्रश अशा अनेक गोष्टी आल्या आहेत. मार्केटींगच्या या जमान्यात या यात असलेल्या विविध ब्रॅण्डसी उलाढाल काही हजार कोटींच्या घरात असल्याचंही पुढे आलंय.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Fashion

  पुढील बातम्या