मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सावधान! मुंबईतील ही 5 ठिकाणं आहेत धोक्याची

सावधान! मुंबईतील ही 5 ठिकाणं आहेत धोक्याची

मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभाग हे पश्चिम  उपनगरातले आहेत.

मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभाग हे पश्चिम उपनगरातले आहेत.

मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभाग हे पश्चिम उपनगरातले आहेत.

मुंबई, 30 मार्च : सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाण आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत. याचाच अर्थ असा की, सगळ्यात जास्त लागण याचं पाच प्रभागात होते. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

मुंबईत रविवारी जवळपास 7000 रुग्णांची नोंद झाली. जी मुंबईसारख्या गर्दीच्या शहराची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभाग हे पश्चिम  उपनगरातले आहेत. आणि दर आठवड्याला याच वॉर्डातील कोरोना रुग्णांची दरवाढ वर खाली होते. रुग्ण दुपटीचा कालावधी पण कमी होत आहे. त्याच बरोबर दर आठवड्याला रुग्ण वाढीचा दरही  अनेक प्रभागात जवळपास तीन पटीने वाढलेला आहे.

हे ही वाचा-'इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार'; या देशात एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड

बांद्रा पश्चिम या प्रभागात  मागच्या 7 दिवसात 1763 रुग्ण सापडले आणि इथली रुग्णवाढ सुरूच आहे. इथला रुग्णवाढीचा दर हा 1.78% इतका आहे. 21 मार्चला इथली एकूण कोरोनाबधितांची संख्या 13387 इतकी होती, जी 28 मार्चला वाढून 15,150 इतकी झाली. आतापर्यंत 330 लोकांचा मृत्यू झाला असून सध्या 2222 इतके सक्रिय रुग्ण आहेत. सद्यस्थितीला 374 मजले तर 10 इमारती मजले सील आहेत. तर इथे 1 कन्टेनमेंट झोन आहे.

बांद्रा खालोखाल गोरेगावात रुग्णवाढीचा दर 1.69% असून मागच्या 7 दिवसांत 1825 तर चेंबूरमध्ये रुग्णवाढीचा दर 1.68% त्या खालोखाल अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्वमध्ये रुग्णसंख्या मोठया प्रमाणावर प्रमाणावर वाढत आहे. चेंबूर वगळता इतर 4 प्रभाग हे एकट्या पश्चिम उपनगरातले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या पाहता कदाचित लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते? आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या मते लॉकडाऊन लागला तर त्याचं राजकारण करू नका.

First published:
top videos

    Tags: Corona hotspot, Corona spread, Covid cases, Maharashtra, Mumbai, Pune