Home /News /mumbai /

सावधान! कोरोनाची भीती वाढली; गेल्या 24 तासात मृतांच्या आकड्यात दुप्पट वाढ

सावधान! कोरोनाची भीती वाढली; गेल्या 24 तासात मृतांच्या आकड्यात दुप्पट वाढ

कालच्या तुलनेने आज कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे.

    मुंबई, 5 जानेवारी : देशातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाची (Coronavirus) लशीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले असली तरी नवकोरोनाची भीती कायम आहे. कालच्या तुलनेने आज कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे. आज 60 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काल (4 जानेवारी)  29 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार कालच्या तुलनेत आज मृतांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3160 नवीन रुग्णांचे निदान झाले असून आज 64 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.55 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 13061976 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 1950171 (14.93 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 241557 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1788 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज 2828 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण 1850189 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.87 % एवढे झाले आहे. हे ही वाचा-कोरोना लस घेण्याआधी किंवा नंतर दारू प्यायलेली चालते का? तज्ज्ञांनी दिलं हे उत्तर कोरोनाची लस (corona vaccine) कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाची (corona vaccination) तारीख जाहीर केली आहे. 13 जानेवारी 2021 पासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. देशातील कोरोना लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाची तारीख सांगितली. 13 जानेवारीला कोरोना लशीचा (covid 19 vaccine) पहिला डोस दिला जाणार आहे, लसीकरणाची मोहीम चालवण्यासाठी चार मोठी केंद्र आहेत. हवाई मार्गानं लसीची वाहतूक केली जाणार आहे.  असं त्यांनी सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या