S M L

मुंबईतील बीडीडी चाळी आता होणार इतिहासजमा, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

डिलाईल रोड, वरळी, नायगाव इथल्या 194 चाळींचं होणार पुनर्विकास

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 10:54 AM IST

मुंबईतील बीडीडी चाळी आता होणार इतिहासजमा, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

20 एप्रिल :  गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या गिरणगावातील सुमारे 95 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत! मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22 एप्रिलला भूमिपूजन होणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या अडीच वर्षांत मार्गी लावले आहे. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी इथल्या 207 बीडीडी चाळी असून यातल्या डिलाईल रोड, वरळी, नायगाव इथल्या 194 चाळींचं पुनर्विकास होत आहे. 160 चौ. फूटांच्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी चाळकऱ्यांना 500 चौ. फूटांची सदनिका मोफत मिळणार आहे.

डिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी हा परिसर गिरणगाव म्हणून ओळखला जात होता. या गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उम्या राहिल्या आहेत. परंतु या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीत बहुतांश गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबं राहतात. श्रमिकांची वसाहत असलेल्या बीडीडी चाळी जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. आतापर्यंत अनेक सरकारांनी चाळींच्या पुनर्विकासाच्या केवळ घोषणा केल्या.प्रत्यक्षात बीडीडी चाळकरी 160 चौ. फूटांच्या खोलीत दयनीय अवस्थेत राहत होते. डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी  इथल्या 92 एकर जागेवर या 207 चाळी वसल्या आहेत. यातल्या वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड इथल्या 195 चाळींचा पुनर्विकास होत आहे. शिवडी इथल्या बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्या पुनर्विकासाबाबत प्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 10:25 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close